कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

 काय कबीर कसा काय चालू आहे पाठांतर आणि स्वाध्याय.

चालू तर आहे आचार्य पण एवढी मेहनत आणि तीही या वयात ही खरच गरजेची आहे काय .

कसली मेहनत तू फक्त इतर जुन्या माणसांनी लिहिलेल्या ग्रंथांचे पारायण करून ते आत्मसात करत आहेस खरी मेहनत ती असते जी तुम्हाला स्वतः निर्माण करून देते जगाला देण्यासाठी.

म्हणजे तुम्ही म्हणताय अजूनही असे अनेक ग्रंथ बनत आहेत आणि ते सुद्धा काही काळाने माझ्या पुढच्या पिढ्यांना असेच पाठ करावे लागतील .

हो जसे वेद आणि त्यांचे सिद्धांत पुराणात दृष्टांत रूपात प्रकट झाले तसेच आजच्या काळात आपण वेगवेगळ्या कवी लेखक ग्रंथकार यांच्याकडे बघतो .

वेळोवेळी अशा गोष्टी एकत्र करून जतन केल्या जातात.

रामायण महाभारत ह्या अशाच अमरचित्रकथा आहेत .

त्याही गोष्टींचे संकलन आहे ती एकाच वेळी रचलेली गोष्ट वाटेल पण पर्व आणि कांड जे संभाषण रुपात सांगण्याचा प्रयत्न करतात ते त्या भूमीतील आदर्श पुरुष वंश आणि त्यांना आता मरणोत्तर दैवी शक्ती किंवा त्यांचे प्रतिक म्हणून ओळखले जाते.

उदा. जर तू गाथा सत्तसई जी प्राकृत म्हणजे प्रतिष्ठानाची भाषा  आहे नंतर पृथ्वीराज आणि महाराणा तसेच शिवचरित्र हे जेव्हा संकलन केले गेले तेव्हा त्यात त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली असे बघशील .

आधुनिक काळात गोष्टी अशा आहेत की 

एका विषयावर कित्येक वर्षांपूर्वी काम चालू झाले आहे आणि ते चालू आहे मग त्यांना संकलित करणे आवश्यक होते म्हणून अमेझॉन सारख्या कंपन्या विकिपीडिया सारख्या कंपन्या कामाला लागल्या आणि तयार झाली सूचीबद्ध रचना आता तुला जो आवडेल तो जसे वेद मंडळ किंवा अष्टक क्रमाने वाचू शकतो किंवा जसे वाटेल तसे वाचू शकतो तसेच ह्या विषयावर असलेल्या सगळ्या गोष्टी तुला एका बटणावर मिळतात.

मध्यकालीन गुरुग्रंथसाहिब ही सुद्धा एक संकलन रचना आहे. ज्यामध्ये अनेक संत गुरु यांचे कार्य संकलित आहे .

मग आधुनिक गुरु कोण आहेत.

हे बघ प्रत्येक विषयाला एक गुरू असू शकतो तरीही तुझ्या वयात एखाद्या व्यक्तीला आदर्श जीवन जगण्यासाठी आवश्यक तत्वे सांगायची असेल तर आपण वेगवेगळ्या कवी लेखक ग्रंथकार यांच्याकडे बघतो 

आता marvel –stan lee – जेवढा तू अभ्यास करशील तुला सिद्धांत हा समजेल (with geat Power will come great responsibilities)

त्यासाठी पूर्ण गोष्टी बघून तुला समजेल की कुठे कुठे ते लागू होतो आणि mutant, x men, हे महायुद्धात पुनर्वसित किंवा तथाकथित आधुनिक संस्कृतीत न बसणारे लोक , पुढे एका भूमीतून देवता आल्या तर अनेक प्रकारच्या प्रयोगांनी बनलेले अनेक गोष्टी नवीन किंवा अतिशयोक्ती वाटेल असे वेगवेगळे माणसे या कथेत आहेत .

पण सिद्धांत तुला जीवन जगण्यासाठी आवश्यक असेल. कथा मनोरंजन आणि पुढील पिढीला सिद्धांत देण्यासाठी आवश्यक उपकरण आहे.


DC - अनेक लेखक 

डिटेक्टिव कॉमिक असे नाव असलेल्या या खंडात तुला नावात कळेल की सुरुवातीला काहीतरी शोध घ्यायचा आणि जगाला धोक्यापासून वाचवायचं असे येथिल सर्व संकल्पना करतात त्यांचा आदर्श असा आहे की काही कारण आहे ज्यामुळे वाईट गोष्टी तयार होतात आणि त्या नक्कीच थांबवता येतील पण कथेतील नायकांना ईतर लोकांना ते कौशल्य आत्मसात नाही तसेच नायक हा जगासमोर आला नाही पाहिजे तो त्याच्या काल्पनिक रूपात राहिला पाहिजे हे एक सिद्धांत.


Pixar –असे म्हणतात कधी कळी स्टीव्ह जॉब नावाचा माणूस या गटात काम करत होता किंवा दुसऱ्या कोणतरी या सर्व गोष्टी एका विषयावर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला असे सापडले की man –animal–machine यांचं नातं कायम राहील त्यामधील संबंध बदलला तरी तिन्ही पक्ष महत्वाचे आहेत.

मग काही जागी फक्त मशीन असलेले जग आहे पण तेही माणसांना शिकवून जाते.

इकडे पूर्वेकड एक मोठा संपद्रय समज बनला आहे जो जपानच्या manga आणि Anime concept वर चालतोय .

भारतीय भाषेत सांगायचे झाले तर पुराण ही वाचायची गोष्ट आहे ती manga आणि दर्शन ही स्वतः बघून अनुभव आत्मसात करण्याची गोष्ट आहे ते anime

DBZ, Pokemon , transformer, अशा अनेक प्रकारच्या अनेक लेखांनी बनलेला हा संप्रदाय किती वर्ष टिकतोय आणि ते कसे काय हे ही आपल्याला बघावे लागेल.

मला वेळ आणि पुराण हे माहित आहे दर्शन काय आहे.

हे बघ दर्शन ही अनुभवायचं असत तर .

6 आस्तिक आणि 3 नास्तिक 

अशा प्रकारे विभागले गेलेले दर्शन आहे .

त्या वेगवेगळ्या पद्धतीनी तू सिद्धांतवादी जीवन जगू शकतो.

त्या गोष्टी दुसऱ्या किंवा तिसऱ्या सत्रात असतील तुला .

पण माझ्या जीवनातील 2 3 अनुभव जे मी फक्त तुला ऐकायला ठेवले असे समज .

माझा पहिला अनुभव म्हणजे माझी आई मला सांगायची की 

पिढी लोटली की घडी लोटते म्हणजे काय तर पिढी नुसार कर्मांची जाणीव कमी होते म्हणजे तीच म्हणणं असे होत की राम कृष्ण यांच्या काळात 7 पिढ्यांचा हिशेब ठेवला जायचा आणि स्वतःच्या अनेक जन्माचा पिढी लोटली आमच्या आज्याचा हिशेब आम्ही ठेवत आलो पण तुमच्या काळात हिशेब तत्काळ झाले आहेत .

व्यवहार संस्कार हे एक पिढीच पुढे गेले तर नशीब .

आणि कुठेतरी खरं आहे .

कदाचित आता तुला तुझ्या वडिलांकडून पणजोबा कोण आहेत हे सांगणे अशक्य आहे पण त्याला तुझे एकटेपण आणि नशीब आहे .

अजून पुढे जेव्हा मी पहिल्यांदा मराठी मातीत गेलो आणि गावात कीर्तन चालले होते अभंग कोणता होता माहीत नाही पण शब्द आजही माझ्या कानात आणि मनात आहेत ते म्हणजे 

तीन प्रकारच्या प्रचीती असतात कबीर.

आत्म प्रचीती – जी दर्शनात विधी सांगितली आहे त्यांनीं अनुभवायची.

गुरु प्रचिती –जे मी काही सांगतो आहे तसेच अनेक प्रकारच्या गुरू शिष्य संवादात उपनिषद आणि गीता यात समावेश आहे ती गुरू प्रचीती.

आणि जिथे दृष्टांत नित्य दिसत नसतील तेव्हा 

शास्त्र प्रचीती – वेद ज्यात सांगितले आहे 0 आहे तेच नित्य आहे आणि आपण उपजलो त्यातूनच आणि निपजनार ही त्यातच. आणि आपण ही तेच आहोत.

मग एवढ्या सगळ्या गोष्टी वाचून आत्मसात केल्या नंतर मी काही गोष्टी बनवण्यास सिद्ध होईल आणि त्या गोष्टी मला बनवाव्या लागतील आणि त्या पोचवाव्या लागतील.

जीवनात प्रत्येक माणसाला एवढा वेळ लागेल का किंवा तुला आणि मला एवढा वेळ मिळेल का याची खात्री कोणालाच नव्हती पण मूर्तिपूजा हा मध्यम मार्ग आपण काढला आहे.

जसे माऊली सांगतात देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिलेया ही बघ हा भक्ती संप्रदाय ज्याचा उदय ही प्रतिष्ठान च ते मी सांगायच विसरलो .

जो हे मानतो की देवाच्या दारात जाऊन आले तरी मोक्ष मिळतो.

मूर्ती रुपात आवाहन आणि विसर्जन अशी आपली जुनी प्रक्रिया व्रात्य लोक म्हणजे जी व्रत करतात ती एक 3 ते 11 दिवसात दुर्गा असो की गणेश यांना विग्रह रूपात प्रकट करून त्यांच्या कडून कार्यसिद्धी साठी प्रयत्न करुन विसर्जन केले जात असल्याचे दिसून येते.

काय मग कधी पर्यंत होईल पाठांतर?

लवकरच . मी स्वतः पुढच्या वेळी तुमच्या कडे येईल झाले म्हणून सांगायला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म