गावाच्या शेतात जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा महासेन सांगायला लागला की विश्वनाथ आणि अन्नपूर्णा यांचा मी पुत्र , माझे नाव महासेन . आज AI किती जरी जगात पुढे गेले तरी पोटातील जठराग्नी कसा कधी आणि का तयार होतो हे ते नाही सांगू शकणार. त्याने शेतातील तिळाची एक मूठ माझ्या तळहातावर ठेवून विचारले की सांगा यात किती प्रकारचे जिवसत्व तत्व आहेत उघड्या डोळ्याने ना तुम्ही नाही कोणतीही वस्तू हे मोजू शकत त्यासाठी काही ना काही गोष्टी प्रथम गृहीत धराव्या लागतीलच . पुढे त्याने त्याच्या शेतात असलेल्या सर्व प्रकारच्या धान आणि डाळी तसेच नारळ , डाळींब आणि पेरूचे झाड दाखवले पण नगदी पिकमधील एक ही पीक दिसत नाही का असे मी विचारले तर तो बोलला की नगदी पीक हे व्यावसायिक लोकांसाठी मी तर फक्त माझ्या आईसाठी आणि वडिलांच्या इच्छेसाठी ही जमीन कसत असतो ते ही जमीन आणि पाणी यांचा विशेष अभ्यास माझे वडील करतात . पुढे त्यांच्या घरी गेलो तर महासेनच्या आई वडिलांची भेट झाली . साक्षात काशी विश्वनाथ आणि अन्नपूर्णा माता इथे नदी काठच्या गावात येऊन स्थायिक झाले की काय असे मला झाले . जातांना त्यांनी मला राजगिरा आणि नाचणीचे शेर भर धान ...