महासेन – अन्न हे पूर्णब्रह्म

गावाच्या शेतात जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा महासेन सांगायला लागला की विश्वनाथ आणि अन्नपूर्णा यांचा मी पुत्र , माझे नाव महासेन .
आज AI किती जरी जगात पुढे गेले तरी पोटातील जठराग्नी कसा  कधी आणि का तयार होतो हे ते नाही सांगू शकणार. त्याने शेतातील तिळाची एक मूठ माझ्या तळहातावर ठेवून विचारले की सांगा यात किती प्रकारचे जिवसत्व तत्व आहेत उघड्या डोळ्याने ना तुम्ही नाही कोणतीही वस्तू हे मोजू शकत त्यासाठी काही ना काही गोष्टी प्रथम गृहीत धराव्या लागतीलच .
पुढे त्याने त्याच्या शेतात असलेल्या सर्व प्रकारच्या धान आणि डाळी तसेच नारळ , डाळींब आणि पेरूचे झाड दाखवले पण नगदी पिकमधील एक ही पीक दिसत नाही का असे मी विचारले तर तो बोलला की नगदी पीक हे व्यावसायिक लोकांसाठी मी तर फक्त माझ्या आईसाठी आणि वडिलांच्या इच्छेसाठी ही जमीन कसत असतो ते ही जमीन आणि पाणी यांचा विशेष अभ्यास माझे वडील करतात .
पुढे त्यांच्या घरी गेलो तर महासेनच्या आई वडिलांची भेट झाली .
साक्षात काशी विश्वनाथ आणि अन्नपूर्णा माता इथे नदी काठच्या गावात येऊन स्थायिक झाले की काय असे मला झाले . जातांना त्यांनी मला राजगिरा आणि नाचणीचे शेर भर धान दिले आणि सांगितले जर जमीन असेल तर स्वतःच्या शेतात आणि जर नसेल तर ओळखीच्या आणि जबाबदार शेतकऱ्याच्या घरी हे धान पोचवा .
मो होकारार्थी मान डोलावली आणि पुढे निघालो .
शेतजमीन तर आपल्या सारख्या प्रवासी व्यक्ती ला कसने  नाही जमणार पण त्या कुटुंबाबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि पुढे भविष्यात परत त्यांना भेटावे असे वाटले म्हणून मी परत महासेनला फोन लावला आणि सांगितले की मला तुमच्या आईबाबांनी एक काम दिले आहे त्यात मला मदत कर .
तो म्हणाला ठीक आहे गुरुजी पण त्यात मोबदला लागेल ? काय मी विचारले  तर आपण दिलेलं धान पुढच्या वेळी तुम्हाला येऊन कोणा दुसऱ्या शेतात द्यावे लागेल आणि आपली नियोजित भेट ह्या आपण जिथे आज जाणार आहेत तिथे असावी.
मी ठीक आहे असे बोललो आणि मला कळेनासे झाले नेमके ते कुटुंब ह्या धान शेती बद्दल इतके उत्साही आणि आग्रही का आहे ते समजून घेण्याची इच्छा माझ्या मनात झाली.

ठरल्याप्रमाणे आम्ही एका दुसऱ्या गावात एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो तिथे तो शेतकरी त्याचे भुईमूग काढून घेत होता आणि जवळच त्याने जवळ पास एक वाफा रिकामा केला होता. मला कळले की महसेन ने पूर्वकल्पना देऊन ठेवली होती . जणू काय फक्त मला निमित करून ते माझ्याकडून हा व्यवहार करून घेत होते .
तो त्या शेतकऱ्याला बोलवतो आणि त्याला सांगतो की हे ठाकूर गुरुजी आहेत त्यांनी हे धान परिक्षणासाठी आणलय आणि त्यासाठी ते नियमित तुझ्या शेताला भेट देतील . तो शेतकरी आजही महासेनला पूर्णपणे नाही ओळखू शकला ह्याचे मला आश्चर्य वाटलं.
मला कोणत्या प्रकारच्या अडचणीत फसवले असे मला वाटत होते की तो म्हणाला हा तो शेतकरी त्याच नाव नंदकिशोर आहे आणि आपण जसे बोललो तसे एका महिन्याला तुम्ही त्याला 4-5 महिने भेट द्यायला याल .
आणि माझ्या कुतूहल त्याने निरसित केले की लोक पैशाच्या मागे लागलेत हे खरंच आहे पण काही गोष्टी ह्या जपयच्या असतात त्यासाठी तुमच्यासारख्या प्रवासी लोकांची आमच्या सारख्यांना गरज भासते .मी तुमच्या कामी आलो हेच माझे भाग्य एव्हढे बोलून मी माझ्या गावच्या बसमध्ये बसलो.

मला असे जाणवले की AI च माहीत नाही पण जर मनुष्य काही जाणून घेऊ इच्छित असेल तर त्याला ती वाट सापडेल हे नक्की .
आणि इतका खोल विचार मी कधी केला नाही तो विचार हे कुटुंब करत होते .
भले मी गणिताचा शिक्षक पण मी सुध्दा एवढं AI बद्दल कधी नाही विचार केला आणि मला शेतीबद्दल आज वर विशेष काही माहीत नाही पण आज पासून ते जाऊन बघण्याची मला इच्छा झाली आहे पुढे बघू काय होतेय ते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म