धुरळा

अंकुश चौधरी नायक म्हणून असलेला चित्रपट तसा नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहतो .
पण हा चित्रपट लक्षात राहण्याची कारण म्हणजे त्यात एक गावचा माणूस जो सरपंच बनू इच्छितो त्याच्याविरुद्ध शहरातील आमदाराचा जावई जो मोठ्या स्वप्नांना आपले कमाईचे साधन समजतो .
आणि नंतर जो खेळ सुरू होतो तो आपल्याला राज्यशास्त्र विषयात न सांगितलेल्या 3 विभागातील खेळाडूंची कामे आणि त्यांचे वर्चस्व प्रस्थापित कसे होते हे 
1) किंगमेकर - think tank - हे लोक स्वतः निवडून येतील का नाही याची गॅरंटी नाही पण ह्यांचे व्हिजन एकदम भारी असते . ते गाव शहरात आपले भले कशात आहे हे जाणून असतात .आणि ते जवळपास पडद्यामागून काम करत असतात म्हणून त्यांना प्रसिद्धीची हावही नसते आणि त्यांना फार शौक आहे असेही काही नाही.

2) बाहुबली - कोषाध्यक्ष - sponsor - हे लोक स्वतः बाहेर बसलेले असतात ते कधीही स्वतः मैदानात उतरत नाहीत . तरी ह्यांचं काम असे असते की यांना प्रसिध्दी मिळत असते आणि तोच त्यांच्या अर्थाजनाचा मार्गही असतो(काही प्रमाणात).

3) राजा - चेहरा - hero(king) - हे लोक ते लोक असतात. जे दोन्ही गोष्टी मैदानात कशा प्रकारे आणि कुठे वापरायच्या हे साध्य करत पुढे वाटचाल करत  स्वतः ते पद प्राप्त करतात की त्यांना प्रसिद्धी आणि देखिव निर्णय जो लोकांना प्रवृत्त करतो हे मिळून जाते.

आता प्रत्येक जन किंग किंवा राजा नाही बनू शकत भलेही तुमची इच्छा असो की नसो .
म्हणून होईल त्या मार्गाने आपले कार्य साध्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे .


बाकी तुम्ही कॉमेंट करू शकता आजच्या घडीचे हे 3 पद कोण कोण आणि कशी आहेत आपल्या आजूबाजूला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म