व्यवस्था - कभी नही बदली ना बदलेगी
व्यवस्था : एक श्रेणी बद्ध रचना
भारत एक व्यक्ति पूजक देश आहे हे व्यवस्थेचे मूळ आहे आणि जे कोणी व्यवस्थेला आव्हान देईल जनता अशी आहे की एकतर त्याला समकालीन लोक कधीही मान्यता देताना दिसत नाहीत .
हे वाक्य वादग्रस्त असू शकते पन कोणताही उपदेश जगात प्रथम लिखित स्वरूपात आलेला नाही . वेद, त्रिपिटक , गीता , कुराण , गुरु ग्रंथ साहेब , बायबल , आणि अनेक पंथ , संप्रदाय यांचे प्रथम गुरु संदेश हे सभेच्या , भाषणांच्या , गुरु - शिष्य संवादाच्या , नंतर भविष्य काळात चमत्कार आणि देवत्व सिद्ध करतांना त्यांचे अनुयायी जो कोणी तो मनुष्य आहे ज्याने समांतर व्यवस्था निर्माण केली त्याचे गुणगान गतात , आणि धर्म शेवटी जाऊन पुराण परंपरेला चिटकतो. हे झाले धर्म व्यवस्थेचे जे आपण आजकाल फारसे मनावर घेत नाही किंवा आचरणात आणत नाहीत .
आता शिक्षण व्यवस्थेचे बोलाल तर बाजार झालेली ही व्यवस्था सरकारी धोरणात एकदा बघितली तर गुरुकुल परंपरेसारखी भासते कारण आज काल जे CAP , CAT , IIT , NEET , आणि इतर शिक्षण किंवा नोकरी साठीच्या परीक्षा ज्या असतात त्यात जर व्यक्ति किंवा कुटुंबाने ठरवले नाही तर हे नक्की असते की त्याला कमीत कमी 100 किमी तरी घर सोडून जावे लागणार आणि त्यासाठी अख्खे कुटुंब वाटेल ते त्याग करण्यास तयार असतात .
म्हणजे जे पारंपरिक वाडीलोपार्जित व्यवसाय असतील ते सोडून जर एखादा विद्यार्थी नवीन कौशल्य म्हणून याकडे बघत असेल तर त्याच्या कुटुंबाने हे ग्राह्य धरलेले असते की यात जन्म भराची ताटातुट होणार पण नाईलाज म्हणा किंवा सामर्थ्यावर विश्वास ठेवून म्हणा ते हे करतात .
शासन (राज्य) व्यवस्था ही घरणेशाही ला लागली याचा अर्थ, व्यवस्थेची संक्रमण शक्ति क्षीण होत चालली आहे आणि धर्म व्यवस्थेचे जसे झाले तसेच येथील ही गुरु शिष्य रूप आता लोप होत जाणार हे नक्की , एक संक्रमण प्रकार जो बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवून दिल होता ज्यात अशी तरतूद होती की राजाचा वंश राज वंश म्हणून नाही ओळखला जाणार ते कुठेतरी आता संपवण्याचे काम सर्वप्रकारे होत आहे एकूणच सर्व जनता आणि राजे यात सहभागी आहेत असेच म्हणावे लागेल .
अर्थ व्यवस्था ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी होती आहे आणि राहील कारण पैशाला प्रभाव करणारे लोक हे तुलनेने कमीच मिळतात , धर्म बहुतेक जणांना प्रभावित करतो तसे अर्थात अशी ताकद आहे की तो सर्वाना सारखे वागणूक देण्याचा प्रयत्न करतो पैसा आजच्या मानवी जीवनाच्या प्रत्येक गोष्टी ठरवतो आणि इंग्रजी मेंढपाळांच्या कंपनी सरकार नंतर त्याचे महत्व जगाने ओळखले आहे .
प्रचार प्रसार व्यवस्था ही सर्वात जास्त उत्क्रांत झालेली व्यवस्था , आम्ही ETC चे विद्यार्थी असल्याने आम्ही पोस्ट ऑफिस पासून तर मोबाइल पर्यंत ही व्यवस्था कशी उत्क्रांत झाली हे आम्हाला पहिल्या काही दिवसात शिकवले गेले , आता त्यात भर म्हणजे 2 गट ह्या व्यवस्थेत आहेत एक म्हणजे वाघ्या मुरळी , तमाशा यातील काम करणारे ते लोककलाकर ज्यांना नट नटी आपण आज म्हणतो , आणि दूसरा म्हणजे जे गावात राजा येणार किंवा त्याची दवंडी पिटणारे ते स्वतःला वृतपत्र , माध्यम यांचा संपादक म्हणवणारे पत्रकार हे सर्व ह्या व्यवस्थेत आहे .
न्याय व्यवस्था ही सध्या फक्त स्वतःची जाणीव मोठ्या मोठ्या विधेयकांना अडचणीत आणून करून देते आहे ती सध्या बहुतेक जणांना न्याय देताना दिसतच नाही . तसेही त्यांच्या दृष्टीने फक्त राज्य आणि अर्थ व्यवस्थेत असलेले लोक हे पात्र आहेत बाकी तर सावळा गोंधळ आहे जन समुदाय वैगेरे याच त्यांना काही घेणे देणे नसते .
वरील त्रिशूल असलेल्या चित्रात दाखवल्या प्रमाणे धर्म , अर्थ , न्याय या दंड विधान ठरवणाऱ्या व्यवस्था आहेत आणि शिक्षण , प्रचार प्रसार ह्या ते लोकांमध्ये रुजवणाऱ्या लोक कौशल्य असलेल्या व्यवस्था आहेत .


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा