भाषा आणि विज्ञान, व्यक्तिगत विकास

english & sanskrit duality
अनेक जण इतर देशातील अभ्यासक्रम , प्रकार बघून विचारतात की भारतीय शिक्षण पद्धती फारच अवघड आहे . कोणी मेकाल्य चे नाव घेते तर कोणी गुरुकुल बरे होते असे म्हणतात पण एवढं मोठा कालावधी शिक्षणात घालवायचा कशाला हे पण काही लोक विचारतात .
त्यातील गणितावर सर्वांचे विशेष प्रेम आणि भाषा आणि विज्ञान हे नंतर चे विषय.
त्यातील 2 महत्वाचे उपविषय म्हणजे भाषेतील कोण कोणास म्हणाले ते संदर्भासहित स्पष्टीकरण द्या आणि शास्त्रीय कारणे द्या ते एखाद्या प्रयोगाद्वारे हे प्रमेय सिद्ध करा .
आता वरील नावावरून तुम्हाला कळले असेलच की भाषेत आणि विज्ञानात तुमची समज लहानपणी जशी होती त्याप्रमाणे एक वाक्यात उपयोग होईल अशी रचना पुढे तुमच्या वय आणि समज यानुसार क्लिष्ट होऊन अनुमान प्रमाण सिध्द कसे होते हे सांगण्यासाठी उपलब्ध होईल अशी रचना बनवण्या पर्यंत त्यांचं उत्क्रमण होत असते .
अशा प्रकारे वापरात असलेली किंवा सर्व प्रचलित भाषा उत्क्रांत होऊनच आज आपण बघतो तशा दिसत आहेत आणि संस्कृत जशी गुप्त काळात होती तशी एकविसाव्या शतकात इंग्रजी आहे आणि ती ही कलिष्ट्टे कडे प्रवास करत राहील .
वरील विषय जो की अनुमान प्रमाण आहे त्यासाठी 
सामाजिक जागृती साठी भाषा वापरली जाते तर तांत्रिक जागृती साठी विज्ञान असते.
विज्ञान मनात रुजवण्यासाठी लहानपणी का??  शास्त्रीय कारण विचारले पाहिजे आणि भाषा मनात रुजवण्यासाठी कोण कोणास म्हणाले ते सांगता आले पाहिजे.
बोलणे असे की ह्या 2 गोष्टी जर कोणीही शिकले तर ते लोक पुराण आणि वेद यातील फरक समजून घेण्याची इतपत समजदार होतील असे मला वाटते.
मला कळलेला अर्थ मी येथे मांडतो आहे समर्थन आणि खंडन यासाठी तो अर्थ नेहमी तत्पर असेल .

वेद हे एक संकलन आहे आणि जशी आपण राज्यघटना म्हणतो त्यात कर्तव्य आणि अधिकार याचे वर्णन आहे अगदी तसेच ते वर्णन आहे असे समजावे .
पुराण हे एकदा कर्तव्य अधिकार हे पदसिद्ध माणसाला मिळाले तर त्याने त्याचा कसा वापर केला आणि कोनानंतर कोण ते पद स्वीकारले ह्याची संपूर्ण संक्षिप्त माहिती ज्याला आपण आजच्या काळातील राजपत्र म्हणू हवे तर .
की प्रथम पंत प्रधान आणि विद्यमान पंत प्रधान यांचे नावावर असलेले काम , त्यांचा वचक , त्यांचे युद्ध आणि तह, जे काही रेकॉर्ड वर असेल ते पुढे व्यक्ती पूजक भारत देशात पुराण मानले जातात.
आणि जसे आज काही लोक म्हणतात की आम्ही वेद मनात नाहीत तसे पुढे असाही काल येईल जेथे सनातन धर्म संविधान अमलात आणत असेल आणि काही लोक म्हणतील आम्ही ते मानत नाही.
आज एवढेच पुढे भेटूच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म