भैरव महासेन संवाद
साम दाम दंड भेद यामधून कोणाला न्याय कसं पाहिजे ही माहिती आपल्याला मिळते का महासेन , भैरव जी ही असे प्रश्न मला जास्त पडले नाहीत कारण मी माझे वडील आणि आई यांच्यासोबत राहिलो आणि त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे मी वागत आलोय . बाकी तुझ्या मित्र परिवारात कोण या गोष्टींवर जास्त लक्ष घालते असे तुला वाटते . मी जास्त नाही सांगू शकणार पन मी आणि गिलगामेश सोबत शिकलो आहोत आणि तो मला जरा धार्मिक तसेच आध्यात्मिक दृष्ट्या गतिमान दिसतो . जर तू आणि गिलगामेश यामध्ये कधी विवाद झाला तर तू काय करशील तो विचारवंत माणूस आहे त्याला विरोध करणे ही माझे काम नसेल पण त्याला माझे म्हणणे पान ऐकावे लागेल आणि तो ऐकेल असे मला तरी वाटते .
तु आणि मैत्रयी पहिल्यांदा कधी भेटले -
मी देशपांडे आणि ठाकूर गुरुजी ही मंडळी जेव्हा एक मुलगी तिच्या mba प्रोजेक्ट बद्दल संभ्रमात आहे असे मला सांगत होते तेव्हा पहिल्यांदा मैत्रयी पाहिली . मग पुढे ? मी तिला तिच्या कामात मदत करण्याचे ठरवले आणि टी केली एवढेच !!! हो टी मदत सांगितली मला तिने . आपण तिला आपल्या घरी आणि शेतात घेऊन गेलात तिथे काय मग तिने शेती केली की काय ??
नाही शेती सारख्या गोष्टीत सुद्धा नियोजन करावे लागते ही मला माझ्या प्रोजेक्ट मधून सांगायचे होते आणि मैत्रयी ने ही त्यातील एक विषय घेऊन तिचा प्रोजेक्ट केले .
आणि हा गिलगामेश सोबत जो मुलगा आहे तो कोण आहे . तो एक शिष्यच समजा गिलगामेश चा . एवढा बांधील आहे तो गिलगामेश ला हा आता ठाकूर गुरुजींनी सांगितले आहे तोपर्यंत तरी आहे पुढे माहीत नाही .
आणि तू गावातच राहणार आहे काय ??
हा आता माझे आई वडील आहेत तोपर्यंत तरी मी तिथेच असेल .
ठीक आहे तर मग इथे सर्व जन जे आले आहेत ते फक्त मैत्रयी चे कॉलेज फ्रेंड्स आहेत बाकी काही नाही.
हा तसेच काहीतरी .
मैत्रयी तुला काय म्हणून हाक मारते ,
असा प्रश्न आपल्याला का पडला वेताळ जी ?
सहजच , तुला नसेल सांगायचे तर काही हरकत नाही .
नाही काही प्रोब्ल्म नाही बोलवा तिला आपण समोरच समजून घेऊ की,
बाळा मैत्रयी कोणी तरी आले आहे तुला घ्यायला बघ जरा .
काय डॅडी कोण आहे , अरे महासेन इकडे आत्ताच काय करायला आलायस , आपल्याला site विजिट तर 20 तास नंतर चा वेळ दाखवते आहे .
काही नाही तुझ्या वडिलांना भेटावे म्हणजे जरा योग्य वेळेत सर्व काम होतील असे बोलत होते जहाजवरील लोक , इथे ही दरारा आहे तुमचा वेताळ जी .
हा आणि तू पण काही कमी नाही महासेन मैत्रयी ने भरपूर गोष्टी सांगितल्या तुमच्या ,
ठीक आहे डॅडी मी चालले रेस्ट रूम ला परत . ठिक आहे पण वेळेत तयार रहा . तुमचं प्रत्येक तास महत्वाचा आणि जोखीमभरा आहे .
काय भैरव जी काय समजल .
आता तरी फार सिरियस नाही वाटत पन पुन्हा भेट होणे थोडे दुर्लभ वाटते म्हणून विचारतो एक मुलीचा बाप म्हणून जे मला एका जावायत पाहिजे असलेले सर्व गुण तुझ्यात आहेत पुढे तू आणि तुझ्या घरातील मंडळी ठरवा आणि सांगा .
आपल्या सारखा नावाजलेला आणि जगावेगळ काम करणारा सासरा मिळणे माझे भाग्य असेल पण जरा घाई होत असल्यासारखे वाटत आहे आणि विश्वनाथ जी आपल्याला भेटल्याशिवाय काही निर्णय घेतील यात शंका आहे .
जग आज एक गाव असल्यासारखे आहे तुझे वडील जर त्यांना वाटले तर आपण कोणत्याही माध्यमातून भेट करू की .
ठीक आहे भेटू इथे आहे तोवर . आपल्याला हवे ते उत्तर मिळेल अशी अपेक्षा तुम्ही ठेऊ शकता .
धन्यवाद महासेन . तुम्हालाही धन्यवाद वेताळ जी .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा