कबीर और नाना नामदेव 2
बोल बोल कबीर जर एखाद्या मुलाला आपल्या आई-वडिलांच्या विना राहावं लागले तर त्याच्या मनात काय काय विचार येतात
माझ्या मनात आले तेच नाना
काय काय विचार आले तुझ्या मनात
हेच की आई किंवा वडील यामध्ये कोण कोण मुलाशी नाते ठेवत नाही किंवा फारकत घेते.
तर आज आपण पिपलादृष्टीबद्दल बोलणार आहोत लहानपणीच ते एकटेच होते त्यांची आई आणि वडील यांचे त्यांच्या जन्माच्या वेळीच काही आकस्मिक कारणाने निधन झाले होते आकस्मिक कारण म्हणजे इंद्राला जे वज्र बनवायचे होते त्यासाठी दधिची ऋषींच्या हाडांचे महत्त्व होते आणि त्यांनी त्यासाठी देहत्याग केला
आणि त्यांच्या हाडांपासून चार प्रकारचे हत्यारे बनवले गेले एक वज्र आणि तीन धनुष्य तीन धनुष्य पिनाक सारंग आणि गांडिव.
पीनाक धनुष्य शिव परशुराम आणि जनक यांच्याकडे होता रामाने तो तोडला अशी गोष्ट आहे
सारंग धनुष्य विष्णू राम आणि कृष्ण यांच्याकडे होता
गांडीव धनुष्य वरून देव अग्नीदेव आणि अर्जुन यांच्याकडे होता
वज्र इंद्र आणि कर्ण यांनी वापरले
एवढ्या महत्त्वाच्या कार्या चे जे पिप्पलाद ऋषीला फलित मिळाले ते म्हणजे लहानपणापासून अनाथ राहण्याचे दुर्भाग्य
यावर ते साहजिकच नाखुश असणार
असं गरजेचं असतं का मला तरी अजून काही जाणवत नाही
पिपलाद ऋषी हे पिंपळाच्या झाडाच्या ढोली मध्ये राहत होते म्हणजे त्यांना पिंपळाच्या झाडांनी शरण दिली होती आणि त्यामुळे त्यांचे नाव पिपलाद असे पडले होते.
त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून कोणालाही आपल्या दृष्टीने भस्म करण्यासाठी शक्ती चा वर प्राप्त केला .
एकदा नारद त्यांना भेटले आणि त्यांना ऋषींनी आपल्या या गोष्टीचे कारण विचारले की आपण लहानपणापासून एकटच का होत तर नारद ऋषींनी शनीची दशा हे कारण सांगितले मग काय शनिदेवांचे आवाहन करून त्यांनी शनिदेवालाच भस्म करायला सुरूवात केली हे बघून अनेक देवांना भिती वाटू लागली आणि सूर्यदेवांनी ब्रम्हदेवांना हयात पडायला सांगितले ब्रम्हदेव तात्काळ पिपलाद ऋषी कडे गेले आणि 1 वर थांबवण्याच्या बदल्यात 2 वर मागण्याची विनंती केली .
तर पिपलाद ऋषी यांनी पुढील वर मागितले
1–जन्मापासून ते ५ वर्षांपर्यंत कोणत्याही मुलाच्या कुंडलीत शनीचे स्थान राहणार नाही. जेणेकरून माझ्यासारखे दुसरे कोणतेही मूल अनाथ होऊ नये.
२- पिंपळाच्या झाडाने मला, एका अनाथ मुलाला आश्रय दिला आहे. म्हणून, जो कोणी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतो त्याला शनीच्या महादशाचा परिणाम होणार नाही.
ह्या गोष्टी मध्ये किती खरे आहे आणि खरच जर पिपलाद ऋषी यांनी केलेल्या गोष्टी मला माहिती झाल्या पण माझे आई वडील मला परत थोडीच भेटणार आहेत.
जे बघ जेवढी ज्याची ओळख कमी तेवढे त्याचे चिंतन जास्त .
जो तुला रोज भेटेल त्याला तू आठवणीत थोडीच ठेवणार आहेस .
म्हणजे जर आता दादा भगतसिंह उद्या पासून मला दिसला नाही तरच मी त्याची आठवण काढेन आणि जेव्हा तो रोज माझ्यासोबत होता तेव्हा त्याला मी किंमत देत नव्हतो असेच का.
तू फार विचार करायला शिकला आहेस कबीर.
काही वेळा हे चांगले असते पण बहुतेक वेळा हे चांगले नाही सिद्ध होत .
तू फार विचार करत जाऊ नकोस.
बरं पीपलाद ही अनाथ ऋषी ची गोष्ट मग मार्कंडेय ऋषी कोण ?
मार्कंडेय ऋषी यांची गोष्ट याच्या विपरीत परिस्थिती निर्माण झाली तेव्हाची आहे.
मार्कंडु ऋषींना गुणी अल्पायुषी किंवा गुणहीन दीर्घायुषी पुत्र हे स्वीकार करायचे होते आणि त्यांनी अल्पायुषी गुणी मुलाचे पालक होण्याचं स्वीकारले
म्हणजे इथे पालकांना जाणीव आहे की त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत कायम नसणार आहे आणि त्यांना हेही मान्य आहे की त्यांच्या हयातीत त्यांना स्वतःच्या मुलाला निरोप द्यावा लागणार आहे.
तरी त्यांनी मुलाला सर्व प्रकारचे नैतिक ध्यान प्राप्त करून दिले आणि जेव्हा मार्कंडेय ला त्याची आठवण करून देण्यात आली की आपला निरोप घेण्यासाठी आपले आई वडील नाईलाजाने तयार आहेत .
त्यांनी लहान वयातच शिवाची तपस्या केली आणि महामृत्युंजय मंत्र सिद्ध करून घेतला . तथापि ते आजही चिरंजीव आहेत असे मानले जाते.
म्हणजे काल त्यांना नाही नेऊ शकला?
नाही उलट महाकाल भक्तांना महामृत्युंजय मंत्र मिळाला जो अखंड चिरकाल जीवनासाठी आहे असे मानले जाते.
म्हणजे ऋषींचे कार्य हे चालू परंपरांना आणि विधी विधानं यांना आवाहन असायचे बरोबर का नाना ?
हा असेच काही .
मग ऋषी हे देवांना शाप देणारे होते असेही मी ऐकले आहे ते किती खरे आहे.
भृगू ने शिव आणि विष्णू दोघांना शाप दिले.
अगस्त्य ने नहुशाला शाप दिले
शुक्राने ययाती ला शाप दिले .
दुर्वास ने तर रुक्मिणी, शकुंतला, सरस्वती, इंद्र, कृष्ण पुत्र सांब .
पण सगळ्याच गोष्टींच्या आधीची गोष्ट म्हणजे सनक ऋषी
तुला जर कोणाविषयी हे जाणायचे असेल की तो आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत आहे का नाही तर ही गोष्ट तू उपयोगात आणू शकतो.
काय आहे ती गोष्ट जर तुझ्या सारखा 5 वर्षाचा बालक एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या किंवा जिथे नियोजित भेट घेतली जाते तिथे गेला आणि तुझी भेटीची वेळ नसेल तर तुला तिथे असलेले द्वारपाल त्या व्यक्तीला भेटू देतील का?
नाही.
अगदी असेच सनक ऋषी जे त्यांच्या तपोबळानुसार नेहमीच 5 वर्षाचे बालक दिसत म्हणून चेष्टा करायला बालकाला आम्हीच भेटलो की काय असे जेव्हा जय विजय विष्णूचे द्वारपाल समजत होते तेव्हा ते साहजिकच या तपोबलाच्या गोष्टी वर विश्र्वास ठेवनारे नसतील हे सिद्ध होते.
हा तर सनक ऋषी 5 वर्षाचे बालक दिसत होते म्हणून त्यांना भेट नाकारली, हा विष्णू ने नाही तर त्यांच्या द्वारपाल लोकांनी.
हे तर मी कायम लक्षात ठेवलंय कारण मी अनेक वेळा पंजाबच्या माझ्या स्कूल मध्ये गेलो आणि त्यांनी खूप वेळ मला प्रिसिपल ला नाही भेटू दिले.
पण जेव्हा मी प्रिन्सिपॉल ला भेटलो त्याने मला एकदम शांतपणे ऐकून घेतलं आणि त्या शिपायांना हाकलून दिले.
असे काय झाले होते कबीर.
शिपाई एक कृष्णाची मूर्ती घेऊ शाळेत आले जी तांब्याची होती आणि एक मेणाची जीसस ची मूर्ती जी मेणाची होती.
आणि ते आम्हाला समजून सांगत होते की पाण्यात कृष्ण बुडाले आणि जीसस तरंगले so our god is great.
मला दादा भगतसिंह कडून एक भिंग मिळाला होता जो मी माझ्या बॅग मधून काढला आणि जेव्हा परत त्यांनी दोघांना टेबल वर ठेवले मी उन्हाचा कानोसा घेऊन ते भिंग त्या मेणाच्या जीसस वर फोकस केले आणि काय ते वितळायला लागले हे त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी मला मारले आणि ते भिंग फेकून दिले.
हे मी जेव्हा प्रिसिपल la सांगितले त्यांनी त्या दोन्ही शिपायांना बदलले आणि तिथून पुढे मी कधीही तसा प्रसंग पुन्हा नाही पाहिला.
तुला संघर्ष करायची आवश्यकता का वाटते कबीर.
कारण आई सांगायची लढणा हमारा फर्ज हे पुत्तर तेरा वाहेगुरू मेरा श्याम उसने लढणा ही सीखाया.
पण तुला नाना सांगतो ते ऐक सर सलामत तो पगडी पचास. गीता योद्धे बनवते पण वेडे नाही.
जेव्हा वेळ नसेल तेव्हा कृष्णानेही युद्धभूमी सोडली.
त्यांच्या कर्मासहीत कृष्णाचा प्रतिस्पर्धी लोकांच्या कर्मावर सुद्धा विश्वास होता.
ह्यावरून मला आठवले की कृष्णाने इंद्र आणि सर्प पूजा नाकारली म्हणजे काय केले?
हे बघ जेव्हा आज तू गीता वाचतो तेव्हा दुर्योधन पासून अर्जुन सगळे शरीराच्या काही अंश, अवस्था, अवयव असे साम्य दाखवून वाचतो .
हो मी बघितले आहे कृष्ण हा शरीराचा सारथी आहे बरोबर .
तसेच 2 अवस्था कर्म सिध्दांत करण्यासाठी अनावश्यक आहे एक म्हणजे जिनेंद्रिय बनणे म्हणजे इंद्र समज आणि सर्प ही कुंडलिनी शक्ती शी जोडले जाते म्हणजे जे स्वतःला सिद्ध समजतात.
हे दोन्हीं लोक आजकाल बाबा बनलेले आपण लहानपणापासून बघत असतो आणि त्यांच्या आहारी जाऊन कर्म करणे विसरू नका हे सांगणे म्हणजे त्यांची पूजा नाकारणे.
ठीक आहे थोडाफार समजलो.
उद्या नरसी, जांब, पैठण, फिरून येई म्हणजे तुला काही उदाहरणे दिसून आली तर तू सांगशील.
ठीक आहे नाना नामदेव.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा