कबीर और नाना नामदेव 3
आलास का कबीर इकडे ये , बोला नाना तिकडे काय आहे . आपण आज या मंदिराच्या पुजारी गुरुजी ला भेटायला आलो आहे .
काय नामदेवा कोण आहे हा , नातू का ?
हा , थोडा वेळ ह्याच्या सोबत बस , फार प्रश्न पडत आहेत त्याला .
मग काय करायच आहे . भीती का शंका निरसन ?
जे तुला बरे वाटेल ते कर पण भीती तो स्वीकार करेल याची शक्यता कमी आहे .
काय बाळ काय नाव तुझ ?
मी मॅक्स मला नाना च्या गावात कबीर म्हणतात . अरे वा मग तुला ह्या नावाचे अर्थ माहीत आहेत का ?
हो मला माझ्या आईने मला सांगितले होते मॅक्स म्हणजे मराठीत जेष्ठ म्हणजे मोठा . आणि कबीर म्हणजे ?
कबीर म्हणजे श्रेष्ठ पण कबीर नावाचे एक संत होऊन गेले उत्तर भारतात .
तुझ वय काय आहे बाळ . मी शाळेत जात होतो तेव्हा 4 वर्ष अगोदरची जन्म तारीख लिहिलेली मी पहिली आहे त्यानुसार मी 4 वर्ष वयाचा आहे .
काय भागवता काय वाटत कोण आहे ,कसा आहे .
नामदेवा विलक्षण कीर्ती होईल , आई वडील आणि वंश चंद्र सूर्य असेपर्यंत नाव घेतील असे माझे मन सांगते आहे .
त्याचे आई वडील नाहीत या जगात आता , मी आणि त्याचे आजोबा ही फार दिवस राहील असे वाटत नाही मला त्याचे पुढे काय करावे यासाठी मला guide कर .
माझ्या ओळखीत एक गुरव आहे तो सांभाळेल याला मी तर आहे तोवर आहे .माझ्या नंतर या ठिकाणी कोणी उभा राहील अशी शक्यता नाही मंदिराचा पुजारी म्हणून याला मी उत्तराधिकारी घोषित करायला मला कोणी भेटणार नाही .
फार दूरची आखणी करतोय भागवता , बरे झाले मी थोडा स्थिर झालो ,
नाना यांचं वय काय.
बाळा माझं नाव भागवत कुलकर्णी मी जवळपास 65 वर्षे जगलो आहे आणि तुझ्यासारखा एवढ्या कमी वयात एवढी प्रतिभा मिळवलेला एकच मुलगा आम्ही बघतो आहे
तुझे नाना आणि मी वर्गमित्र त्यांनी फार लांब लांब फिरुन आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न लावून आपल्या मूळ गावी परतणे योग्य समजले आणि त्यांच्या मुलीने तुला फार चांगली शिकवण दिली आहे हेही मला कळते आहे
गुरव म्हणजे कोण ?
बाळा तू महादेवाच्या मंदिरात आहेस आणि महादेवाच्या मंदिरातील पुजाऱ्याला गुरव म्हणतात
मग जो गुरव नाही तो पुजारी होऊ शकत नाही का?
कोणतीही गोष्ट मान आणि जबाबदारी घेऊन स्वीकारावी लागते बाळा जर मान म्हणून तू विचारत असशील तर त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्याही तुला लक्षात घ्याव्या लागतील यावरून एका गुरुवाच्या मुलाला लहानपणापासून गुरव होण्याच्या जबाबदाऱ्या माहीत होत असतात आणि एकदा तो मंदिरात पूजा करू लागला की त्याला गुरव होण्याचे मानसन्मान करतात.
मग एखाद्या गुरुवाच्या घरी कोणीही शिकण्यास आला तर त्यालाही लोक गुरुव प्रमाणे मान देतील का?
तुझे नाना जेव्हा मध्य प्रदेशात एका वाण्याच्या घरी शिकण्यास गेले होते तेव्हा कालांतराने त्यांनीही तेच काम आपल्या सोबत घेतले आणि लोकांनी त्यांना वाण्याएवढाच मान सन्मान दिला
कशाचे दुकान होते नाना आपले
कबीर तुझ्या नानाचे काही वर्षांपर्वी पर्यंत एक कापडाचे दुकान होते. किशोरी च्या लग्नानंतर मी ते काम माझ्या एका मित्राच्या मुलाला याने माझ्याकडे शिक्षण घेतले त्याला दिले आणि मी सरळ गावात आलो
मग आता ते दुकान पूर्णपणे त्या माणसाची झाली आहे असे का
हो तसंच काहीतरी!!!
यांना मी काय म्हणू कारण बाकी लोकांना तर मी नावानेच बोलावतो
आम्ही त्यांना भटजी म्हणतो तुला काय बोलावेसे वाटते
म्हणजे फादर प्रिस्ट किंवा पाश्चर सारखाच का.
नामदेवा प्रत्येक वेळी आठवण येते आणि तू नेमकी कोणत्या कारणा पायी तुझ्या मुलीला एका पंजाबी शीख मुलाशी लग्न करू दिले असे मला विचारावे वाटते आणि तो मुलगा त्याच्या हयातीतच धर्मांतरण करतो यावर तुला काय बोलावेसे वाटते.
प्रारब्धाचा भाग एवढेच बोलेल मी.
प्रारब्ध म्हणजे काय?
बाळा तुला तुझ्या आईने शंकराचार्य नावाच्या ऋषीची गोष्ट सांगितली का?
नाही हे नाव मी पहिल्यांदा ऐकतो आहे
त्या अगोदर हे ऐक मीही लहानपणापासून या गावात राहतो पण माझा एक भाऊ जो आजवर या मंदिराचा पुजारी होता तो मागच्याच वर्षी कालवण झाला आणि मग माझ्याकडे हे पुजारी भरण्याची सौभाग्य आले तर माझ्या भावाला कधीही संसारामध्ये रस नव्हता आणि त्याने लग्न केले नाही तुझ्या ओळखीत किंवा तुझ्या आईने तुला अशा कोणत्या माणसाशी गोष्टी रूप म्हणा किंवा प्रत्यक्ष म्हणा भेट घालून दिली का
नाही वर्ण आश्रमाच्या चार वर्णांमध्ये चारही वर्ण पूर्ण होताना शेवटचा वर्ण संन्याशाश्रम आहे असे मला माझ्या आईने सांगितले.
काही लोक जसे की माझा भाऊ हे लहानपणापासूनच संन्यास धर्माशी असक्ती ठेवतात आणि बाकी सर्व विसरून फक्त देवदेव करतात.
त्याने काय साध्य होते असे तुला वाटते?
नाही मी याबद्दल कधीच विचार केला नाही .
तर आता आपण आधी शंकराचार्य यांच्या गोष्टीकडे लहानपणापासूनच शंकर संन्यास धर्माविषयी असती ठेवतो पण त्याच्या आईमुळे त्याला आपल्या सदनामध्ये आयुष घालवावे लागत आहे असे त्याला वाटे पण तुझ्या आईने सुद्धा तुला याविषयी काही सांगितले नाही यावरून कळते की कोणतीही आई स्वतःच्या मुलाला संन्यासी बनवू इच्छित नाही कारण वंश नावाचा प्रकार हा मुलाद्वारे पुढे जातो अशी धारणा आहे आणि मुलगा संन्यासी झाला म्हणजे वंश संपला असे गृहीत धरले जाते.
शंकर आणि शिवतारका यांच्यामध्येही असेच संवाद विशेष करून होत होते
एके दिवशी जेव्हा शंकर आणि शिवतारका नदीवर स्नानासाठी गेले होते तेव्हा एका मगरीने शंकराला पकडले आणि ती वाचवण्यासाठी विनवणी करू लागली
या क्षणी जे शंकराच्या मनात आले ते प्रारब्ध होय त्याला हे कळून चुकले की ही सर्व दुनिया मिथ्या आहे आणि अंतिम सत्य शोधले गेले पाहिजे म्हणून त्याने त्याच्या आईला सांगितले की संन्यास धर्म स्वीकारण्यास जर मला संमती मिळणार असेल तर मी स्वतः या मगरमिठीतून सोडवून घेतो.
मग काय नाईलाज का होईना त्याची आई त्याला होकार देते आणि संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर काय करायचे हे त्याला माहीत असेल का नाही पण कलाडी पासून केदारनाथ पर्यंत तो संपूर्ण देशभर भ्रमण करत राहिला आणि आपल्या धर्माची पताका या देशात पुन्हा फडकवली याला दिग्विजय म्हणतात
याला कोणता धर्म म्हणतात.
याला भरपूर नावे आहेत आर्य सनातन वेदिक हिंदू असे नाव बदलत आले तरी व्यवस्था तीच आहे तुम्ही या मंदिराचे पुजारी जर झाला तर तुम्हाला त्याची जबाबदारी आणि संपूर्ण धर्माची व्यवस्था टिकवण्याची ही जबाबदारी स्वीकारावी लागते प्रारब्धाने का होईना मी तुला हा प्रश्न विचारू इच्छितो तुला हे सर्व मान्य आहे का?
हे सर्व बोलण्या अगोदर तर मला सांगता आले नाही पण माझे दादा भगतसिंग मला एका वैष्णव आचार्यांकडे घेऊन गेले होते तेथे रामानंद नावाचे वैष्णव आचार्य आणि गिलगमेश नावाचे एक नव वैष्णवाचार्य मला भेटले त्यांनी मला ही जाणीव करून दिली की मला भविष्यात कधीतरी काही विशेष कार्य करायचे आहे आणि त्यासाठी मी आधीपासून तयार असले पाहिजे त्यामध्ये इतिहास लेखन किंवा संकलन ही बाब महत्त्वाची होती आता त्या जबाबदारी साठी सुद्धा मला तयारी ठेवावी लागेल आणि आपण जे सांगितले आहे ते मला मान्य आहे पण आपण जसे बोललात इथून स्थलांतर करण्याअगोदर मी दुसऱ्या कोणाला तरी ती जबाबदारी देण्याचे काम पार पाडेन. जसे नाना नामदेवांनी मध्य प्रदेशात केले आणि तुम्ही तुमच्या भावाकडून करून घेतली तसेच!!!
तुझी उपलब्धी फार मोठी आहे बाळा तू या वयात आम्ही न केलेल्या गोष्टीही केल्या आहेत
आम्ही कधीही वैष्णव आचार्य बघितले नाहीत सुदैवाने तुझ्या दादांनी तुला काही चांगले क्षण दाखवले आहेत त्यांचाही तू विचार करतो आहेस ही चांगली गोष्ट आहे
कबीर काय नाव म्हणाला नववैष्णवाचार्यांचं गिलगमेश
फार वय नसावं त्या मुलाचे.
आई एवढाच असेल तो .
भागवता तुला मी ज्या मुलाबद्दल सांगत होतो की तो पुण्यात आला आहे हाच तो मुलगा पुढे भेट होईल तेव्हा बघू पण फार पुढे निघून गेला आहे तो.
हा हा त्यांना काहीतरी मोठे काम दिले गेले आहे पश्चिमेकडील चंद्रवंशी राज्यांना नवीन राजा देण्याचे काम त्यांना दिले गेले आहे आणि कुठेतरी उरक नावाच्या शहरांमध्ये त्यांना जायचे होते.
बापरे विदेश भ्रमण फार मोठा झाला आहे गिलगमिश तू त्याला कधी भेटलास.
इकडे येण्याच्या अगोदरच आणि ते मला विचारतही होते की तारापीटल येशील का पण दादांनी मला इकडे आणले आणि मला ते योग्यही वाटते कारण रामानंदांनी सुद्धा सांगितले की तो जे बोलतो ते ऐक आणि मी बोलून गेलो नरसी पासून घुमान पर्यंत एवढेच माझे कार्यक्षेत्र
तुझी वाणी उत्तम आहे बाळा येत रहा बोलत रहा अजून भरपूर कार्य करायचे आहे आपणास.
धन्यवाद भागवत भटजी
भेटू भागवता याला तीर्थक्षेत्रे फिरवून आणावे म्हणतो.
सर्वप्रथम पैठणला जाऊन या तेथे आणखी काही बघायला मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे.
ठीक आहे कबीरा उद्या तुझ्या दादांना घेऊन आपण पैठणला जाणार आहोत तयारीला लाग.
ठीक आहे नाना.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा