कबीर आणि नाना नामदेव- जांब समर्थ
नाना बोला दादा कधी येणार आहे आणि आपण कुठे जाणार आहोत.
कबीर आपण तुझे दादा आल्यावर एका तीर्थक्षेत्राला जाणार आहोत ज्याचं नाव जाम समर्थ
येथून किती वेळ लागेल.
जवळपास तीन ते चार तास .
मग एका दिवसात येणं जाणं होईल का
ते बघ तुझी दादा आले आता निघालो तर नक्कीच होईल.
राम राम नामदेव जी सत श्री अकाल भगतसिंग जी
प्रवास कसा झाला
नेहमीप्रमाणेच शांत कारण आपल्या नातवाला बघायला आलोय.
कबीर ला जाम समर्थ ला घेऊन निघालो होतो पण आपण येणार असे कळाले म्हणून आपण येईपर्यंत थांबलो आपणही सोबत यावे म्हणजे काहीतरी नवीन बघण्यास मिळेल.
चालेल मी आवरतो आणि लगेच निघू
जय जय रघुवीर समर्थ नारायणराव
राम राम नामदेवा कसं काय घेणं केलं नातवाला घेऊन आलो होतो मंदिर तीर्थ दाखवायला .
नाना मंदिर आणि तीर्थ एकच असते काय
नामदेवा नातू हुशार दिसतोय आईवडिलांचे संस्कार हा पण फार कमी सहवास लाभला त्याला आई-वडिलांचा काय बोलतो आई वडील नाहीत त्याच्यासोबत कुठे असतात आता ते देवा घरी गेले हे कबीर चे आजोबा भगतसिंग
नमस्कार नमस्कार
कबीरा काय वय बाळा तुझं मी आता पहिलीत शिकतो
म्हणजे पाच वर्ष
हा तेवढेच
मंदिर हे पूजा करण्याचे ठिकाण आहे आणि तीर्थ हा शब्द नदीकिनारी असलेल्या एखाद्या ऐतिहासिक विभूतीबद्दल किंवा तिच्या सहवास लावलेल्या क्षेत्राला संबोधला जाणारा शब्द आहे मी जे बोलतोय ते तुला कळते का
विभूती म्हणजे काय.
चारशे वर्षांपूर्वी या क्षेत्रा वर एक अशी व्यक्ती जन्मली जिची कीर्ती आजही आपल्या सोबत आहे आणि लोक ज्यांना मूर्ती रुपत जपून ठेवतात त्यांना विभूती म्हणतात .
या विभूतीचे नाव काय
नारायण सूर्याजी ठोसर आणि जगाला जे माहित आहे ते रामदास रामनवमीच्या दिवशी जन्मलेले हे व्यक्ती ज्यांनी मनुष्याने मनावर ताबा मिळवण्यासाठी रामाचा आधार घ्यावा अशी संकल्पना मांडली आणि त्यांचे मनाचे श्लोक सर्वांना माहीत आहेत तसेच गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा अशा गणपतीची आरती आणि राम भक्त हनुमान यांची आरती हे त्यांचे लोककल्याणासाठी उपलब्ध असलेले कार्य आणि कवी लोकांना स्वतःचं जीवन काव्यरूपात लिहिण्याची सवय असते म्हणून स्वतःला जो बोध झाला त्याला दासबोध या नावाने त्यांनी लिहिले जे फारसे प्रचलित नाही आणि प्रत्येक व्यक्तीला ते शक्य नाही की दासबोध आणि त्यातील प्रत्येक श्लोक पाठ करून त्याचा आयुष्यात कुठे उपयोग होईल याचा अभ्यास करत बसणे.
नारायण सूर्याजी ठोसर आणि रामदास हे एकच म सगळ्यांना रामदासच माहित आहे असे का
एक नाव जे तुमचे कुळ वंश आणि स्थान दर्शवते.
आणि कवी लोकांचा दुसरा गुणधर्म म्हणजे त्यांना टोपण नावाने जगासमोर जाण्याची भीती वाटत नाही जर स्वतःच्या वडिलोपार्जित नावाने ते जगासमोर लिहित गेले तर अनेक प्रकारच्या पूर्वग्रहांना त्यांना सामोरे जावे लागते . जसे आजकाल भरपूर संतांना जातीच्या किनाऱ्याने बघितले जाते.
हे कवी लोक फार हुशार असतात का
हा काही इतिहासात जगतात काही बघायच्या पुढच्या गोष्टी करतात.
जात म्हणजे काय असतं आणि गोत्र ते दोन्ही सेमच असतं का
आजकालच्या जगात जात हा व्यवसाय आधारित धर्म आहे जो तुम्ही उपयोगात आणला पाहिजे लग्न परंपरा वार्षिक सण आणि सोळा संस्कार जे धर्माने दिलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये काही फारकत आहे आणि हे कुळ प्रकाराणे फारसे जोडले जाते.
गोत्र हा शब्द जातीशी संबंधित नाही एकाच गोत्राच्या अनेक जातीच्या लोकांना बघितले जाऊ शकते कारण जेव्हा पितृसत्ताक वंशाला बघितले जाते तेव्हा सात आठ 24 किंवा आजकाल 49 108 असे वेगवेगळे नावे असलेले शब्द वापरले जातात जे की मुळ ऋषींची नावे आहेत असे मानले जाते त्यामुळे आपण असे बोलू शकतो की जेव्हा पित्याचा वंश बघायचा असेल तेव्हा गोत्र बघितले जाते आणि विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या गोत्रात आहात तुम्ही त्या गोत्राचे यजमान होऊ शकत नाही तुमचा देवकुलिक हा दुसऱ्या असतो, तुमचा विवाह सुद्धा दुसऱ्या गोत्राच्या कन्याशी होतो, तुम्ही तुमच्या गोत्राचे कुलगुरू होऊ शकत नाही हे आजपासून नाही तर गोत्र परंपरा सुरू झाल्यापासून आहे.
मी जे बोलतोय ते सर्व कळतं आहे ना
सध्या समजण्याची गरज नाही मी फक्त ऐकत आहे या गोष्टी तुम्ही बोलत आहात त्या नक्कीच कामाच्या असतील आणि कुठे ना कुठे त्याची गरज असेल.
तुम्हा दोघांना खरेच नशीब म्हणावे लागेल वयोमानाच्या तुलनेने माझ्यासमोर जो मुलगा आहे त्याची समज फार उच्च प्रतीची आहे आणि तुम्ही त्याचे वंशज आहात एवढे तुमचे नशीब आहे.
यात सुखदुःख दोन्ही आहे नारायणराव तो आमच्या वंशातील आहे हे सुख आणि आम्ही फार काळ नाही आहोत हे दुख
अशा विद्यार्थ्यांची मठाला गरज आहे असे मला वाटते आध्यात्मिक कार्यासाठी हा मुलगा योग्य आहे आणि त्याचा इथे पूर्णपणे बंदोबस्त होईल असे मला वाटते आपल्याला काय वाटते शेवटी निर्णय तुम्ही घेणार आहात पण समजदार असलेल्या या मुलाला काय वाटते ते तुम्ही विचारा.
काय कबीरा शिकण्यासाठी मठामध्ये राहणे तुला चालेल का.
मठात काय शिकवले जाते जे जे शाळेत शिकवतात तेच का.
कबीर आपण जेआता बोललो ते कोणतेही शाळेत शिकवले जात नाही हा पण मठामध्ये शिकवले जाते. आणि शिक्षण म्हणजे एक निरंतर प्रवास आहे असे मला वाटते तुझ्या दोन्ही आजोबांना सोडून तू राहू शकतो का .
ज्यांच्या सबत मी आजवर राहिलो आहे
त्यांना सोडून मी राहू शकतो पण मला इथे कोणासोबत राहायचे आहे हे समजणे आवश्यक आहे.
इथे तुझ्याच वयाची आणि तुझ्या पेक्षा कमी जास्त समज आणि क्षमता असलेले तुझे सह पाठी असते थोड्या वेगळ्या प्रकारचे शिक्षण पण जगात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणासोबत थोडेफार आत्मिक ज्ञान इथे जास्त प्रभावीपणे मिळते.
मी अजून काही वर्ष माझ्या नाना सोबत राहिलो तर तुमची काही हरकत नसावी.
काही हरकत नाही फक्त जे बाहेर ज्ञान तुला मिळेल आणि इथे जे ज्ञान त्या वयात दिले जाते यात जो काही फरक असेल तो तुला पूर्ण करावा लागेल म्हणजे तुझ्याकडे इतरांपेक्षा कमी वेळ असेल
आपल्यामध्ये मी कमी वेळात इतरांपेक्षा जास्त ज्ञान ग्रहण करू शकतो जर हे बरोबर असेल तर मी माझ्या नाना सोबत जातो.
जशी तुझी इच्छा येथील मठ नेहमी तुझ्यासाठी स्थान ठेवेल माझ्या उपस्थितीत तो या मठात येशील अशी अपेक्षा.
नक्कीच
नाना मला आपली गोत्र कसे कळेल
ते तर तुला तुझे दादा सांगू शकतील .
मला याबद्दल फारशी माहिती नाही कारण जेव्हा माझा मुलगा ख्रिश्चन बनला होता म्हणजे मी सुद्धा या सर्व संकल्पना पासून दूर असल्यामुळेच त्याने दुसरा धर्म स्वीकारला.
नाना आता मला माझा गोत्र कसा कळेल
नारायण राव मुलाच्या शंकेच निरसन करा
कबीरा दादाजी जेव्हा त्यांच्या गावी जातील तेव्हा ते तिथे विचारू शकतात आणि तुला ते समजू शकते पण आजच्या जगात काही गोष्टी अनौपचारिक सुद्धा झाल्या आहेत जसा तू विचार केलास तसाच विचार मी तुझ्या वयात केला होता आणि जे माझ्यासमोर आले ते मी स्वीकारत गेलो उदाहरणार्थ मी माझ्या कुळ आणि गोत्राबद्दल अनभिज्ञ होतो पण मला जीवनामध्ये मातृशक्ती म्हणून रेणुका माता मिळाली आणि गुरु शक्ती दत्तात्रय यावरून मला जे मिळालं ते माझं कुळ आणि ज्याचा आधार घेऊन माझे वंश पुढे चालेल ते नाव म्हणजे माझे गोत्र माझ्या मत
हे तुला समजण्यासाठी पुरेसे आहे
पूर्ण समाधान जरी झाले नसले तरी आता पुरते ठीक आहे मी जेव्हा शिकण्यास येईल तेव्हा तुम्हाला त्याची गरज असावी
बरोबर अनावधानाने का होईना तुला परंपरेची जाणीव सुद्धा होत आहे शतायुषी भव.
धन्यवाद नारायणराव पुढे पैठणला जाण्याचा बेत आहे पुढील आठवड्यात आपणास वेळ असेल तर सोबत चला
नाही सध्या वेगळी काम चालू आहे पुन्हा कधीतरी धन्यवाद .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा