कबीर आणि नाना नामदेव- पैठण

 राम कृष्ण हरी नामदेवा आज गोदातिरी कसे येणे केले .

 नातवाला प्रतिष्ठान नगरी  दाखवावी असे वाटले म्हणून घेऊन आलो हे बाबा कोण आहेत हे नातवाचे आजोबा वडिलांचे  वडील आणि आई वडील कोठे आहेत बाळाचे . 

ते आता या जगत नाहीत . अरेरे माफी असावी . 

बाळा अनाथांचा नाथ असे का करतो ते माहीत नाही पन असो तुझ्या जीवनात नक्कीच काही विशेष आहे म्हणून तू नाथनगरीत आलास . 

काय नाव तुझ ?

कबीर . 

कबिरा पैठण ही आज एकनाथ महाराज यांची नगरी मानली जाते आणि शालिवाहन नावाचा कुंभाराच्या घरात वाढलेला राजा या नगरीचा एक जुना संस्थापक मानतात ,तसेच महादेवांचा जावई नहूष येथे अशोक सुंदरी सोबत राहत असे . जेव्हा इन्द्र अमरावती (आंध्र प्रदेश) येथे होता . या नगरीचा व्यापार रोमन लोकांसोबत होता . 

प्राकृत ही राज्याची मुळ भाषा जी आज आपण मराठी म्हणतो तिची जननी येथे उत्क्रांत झाली आणि गाथा सत्तसई म्हणजे गाथा सप्तशती ही गौतमिपुत्र सतकर्णी याने रचलेली प्राथमिक रचना जी आज फार प्रचलित नाही ती  ही याच नगरीत . 

इथूनच जवळ आहे देवगिरी किल्ला जिथे जनार्दन स्वामी आणि एकनाथ यांचे वास्तव्य होते आणि  वेरूळ अजंठा लेण्या ज्यात कैलास मंदिर जगप्रसिद्ध आहे. 

अजून काय ऐकलं आहे का तू पैठण  बद्दल ??

माझे आजोबा म्हणतात पैठण मध्ये गोदावरी नदीचे जायकवाडी धरण आहे मला ते बघायचे आहे . 

बरोबर बोलतोय तू ह्या पुरणातल्या वांग्याना पुराणात ठेवणे बरच राहील पान बाळा तुला माहिती आहे का शहर कितीही मोठे झाले तरी ते प्रगत तेव्हाच मानले जाते जेव्हा त्याच्या गरजा शहरच पूर्ण करेल आणि मानवी जीवनात अन्न वस्त्र निवारा या गोष्टी कोणत्या ठिकाणी मिळतात तर त्या शेतीत मिळतात म्हणजे जिथे शेती आहे ते शहर प्रगत होऊ शकत असे तुला वाटते का . 

मला नाही सांगता  येणार , मी हे अगोदर कधी मनात नाही आणले . नाना यांच  नाव काय आहे ?

हे या गावचे शिक्षक आहेत सदानंद नाव त्यांच ते नाथ महाराजांचे वंशज आहेत . 

मला आपण हे सांगू शकाल की पैठणी रोमन राज्यात कशी पोचायची ?

हा उत्तम प्रश्न ?

चाणक्याच्या काळात प्रतिस्थान ते पाटलीपुत्र मार्गाला दक्षिणपथ बोलायचे तर नालंदा ते तक्षशिला यांच्यातील मार्गाला उत्तरपथ म्हणले जायचे  आणि पुढे अरब ,युनानी  ते रोमन असा प्रवास व्हायचा पैठणीचा . 

अजून काय काय आहे इथे . 

इथे म्हणजे प्रतिष्ठान ज्या राज्याची राजधानी होती त्या राज्याला आज शिवाजी महाराज जे वेरूळचेच  भूमिपुत्र होते 

दख्खन चा प्रदेश म्हणतात 1947 पुर्वीपर्यन्त  असलेल्या पूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि काही राजस्थान चा प्रदेशआणि हेदराबाद निजाम हा सातवाहनांचा राज्याचा भाग . वारली चित्र आणि मातीची भांडी जणू शालीवहाणापासूनच या मातीचा आवडता छंद . म्हणजे चाकावर मातीची भांडी बनवणारी सभ्यता प्रगत सभ्यता मानावी लागते . 

तरीही ज्या राज्याबद्दल आपण संगत आहात  त्याच्या काही नैसर्गिक सीमा आहेत का जसे नदी / पर्वत इत्यादि . 

हे बघ कबिरा नर्मदा नदी आणि विंध्य पर्वत  मुख्य कारण आहेत सीमा आर्य द्रविड विभागाचे आणि गोदावरी आणि कृष्णा यांच्यातील प्रदेश हा सातवाहनांचा . तसा हा प्रदेश आर्य द्रविड मिलन स्थान आहे पण अगस्ती ऋषि , खंडोबा म्हणजे स्कंद मुरूगन आणि हनुमान या तीन लोकांमुळे द्रविडांचा प्रभाव इथे जास्त आहे . 

मी सध्या फक्त गोदावरी आणि कृष्णा नदी एवढेच समजू शकतो . बाकी गोष्टी मला काही विशेष नाही कळल्या . 

ठीक आहे गोदावरी आज नाशिक ते बंगाल च्या उपसागरात वाहते आणि कृष्णा सातारा ते बंगाल च्या उपसागरात वाहते . त्याच्या मधील प्रदेश प्रतिष्ठानचा प्रदेश असे समज.

ठीक आहे मग आज जे वेगवेगळे भाग बनले आहेत ते कसे बनले . मला तुझ्या या विषयात रस असणे आवडले पण तुला त्यासाठी भूगोल आणि इतिहास यासोबत नागरिक शास्त्र आणि अर्थ शास्त्र समजून घ्यावे लागेल जुन्या धर्मांच्या मठात आध्यात्मिक ज्ञान मिळेल पण तिथे या 4 ही विषयांचे प्रगत ज्ञान मिळेलच याची शाश्वती नाही . 

नामदेवा मुलगा हुशार आहे . वेळे आधी समज एकटेपणामुळे असावा . प्रारब्ध काहीही असो आपले काम आहे भविष्याची तरतूद . जे वाटेल ते न लपवता सांगतो ज्ञान हे व्यवहारात येईल असे मिळेल अशी सर्व व्यवस्था करून ठेव याच्यासाठी. 

धन्यवाद आपल्या सल्ल्या बद्दल मी करतो काम .      



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान

कबीर आणि रामानंद –कथा गोष्टी यांचे जीवनात स्थान _२

कबीर आणि रामानंद>> dejavu & अक्षरब्रह्म