कौशिक वैश्वमित्रा कबीर (गोत्रबोध)
प्रणाम आचार्य
शुभाशिष कबीर .
कबीर हा मंत्र कोणाची रचना आहे.
ॐ भूर्भुवः स्वः।
तत्सवितुर्वरेण्यम्।
भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात्।।
ब्रम्हर्षी विश्वामित्र , आचार्य .
आणि मंत्र्यांमध्ये स्तुती कोणाची आहे .
दोन प्रवाह आहेत एक मानतो गायत्री आणि दुसरा मानतो सवितृ म्हणजे सूर्य.
उत्तम .
आणि विश्वामित्र गोत्रातील व्यक्तीला काय नाव आहे राजन कौशिक क्षत्रिय जे विश्वामित्र म्हणून ओळखले गेले त्यांच्या गोत्रातील व्यक्तीला कौशिक म्हणले जाते .
तुला हे माहीत आहे का जर ही सूर्याची स्तुती आहे तर कौशिक सुर्यवंशी हित काय.
नाही कौशिक विश्वामित्र कुश आणि गाधी यांच्या परंपरेतील चंद्रवंशी राजा होता .
आणि विश्वामित्र यांनी कोणाशी स्पर्धा केली .
महर्षी वशिष्ठ जे इक्ष्वाकु आणि सूर्य वंशाचे कुलगुरू होते.
आता हा श्लोक ऋग्वेदात कोणत्या मंडळातील आहे.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
हा श्लोक ऋग्वेदात वशिष्ठ मंडळात आला आहे.
यावरून तुला समजले असेल की चंद्रवंशी राजा अथवा गुरु सूर्याची प्रसिद्ध स्तुती करताना दिसतात तसेच चंद्रशेखर शिवाला सूर्यवंश कुलगुरू वशिष्ठ यांनी आवाहन केले आहे मृत्यूवर विजयासाठी.
जसे तू अगोदर ऐकले असशील की शिव हा सगळ्यात मोठा वैष्णव (राम कृष्ण हरी मंत्र हा शिवाचा), आणि विष्णू (राम) हा सगळ्यात मोठा शैव आहे.
तसेच सूर्यवंश आणि चंद्रवंश अशाच रीतीने एकत्र राहत होते.
विश्वामित्र यांच्या बद्दल आणि काय काय माहित आहे तुला .
विश्वामित्र आणि अप्सरा मेनका यांची एक कन्या शकुंतला हिचा दुष्यंत नावाच्या चंद्रवंशी राजाशी विवाह झाला आणि भरत हा चंद्रवंशी राजा ज्यावरून महाभारत काल पर्यंत ही भूमी भारत बनून राहिली .
अजून एक गोष्ट जी बरेच जण सांगतात ती तुला माहीत नसेल कदाचित जसे शुक्राचार्य असुरचार्य आहेत, त्याचप्रमाणे विश्वामित्र यांच्या नावावरही काही अवैदिक गोष्टी नोंदवल्या जातात .
एक इक्ष्वाकु कुलीन राजा जो हर्षचंद्राचा पिता होता जो आपल्या कर्माने आणि विश्वामित्र यांच्या मदतीने सशरीर स्वर्गात जातो पण इंद्र त्याला ढकलतो . यावर क्रोधित विश्वामित्र त्रिशंकू स्वर्गाची रचना करतात.
राजा असतांनी त्यांचा पहिला वाद नंदिनी गाई वरून झाला जी कामधेनु ची कन्या होती.
आणि अनेक प्रकारच्या प्रयोगांनी त्यांनी ब्रम्हाकडून राजर्षी ही पदवी प्राप्त केली. ब्रम्हर्षी ही पदवी प्राप्त करतांना त्यांना वाशिष्ठांचीच गरज लागली पण .
यातून 2 गोष्टी घडल्या.
1) सुदास हा चंद्रवशी राजा बाकी 10 राजा विरुद्ध जिंकला त्याच्या वशिष्ठ गुरु आणि इंद्रामुळे पण कोणाविरुद्ध विश्वामित्र आणि इतर अनेक कुळातील राजे .
2) राम आणि लक्ष्मण हे दोघे राजपुत्र विश्वामित्र यांनी आपल्या सोबत दक्षिण दिग्विजयासाठी नेले.
भविष्यात ते दोघे परत विश्वामित्राशिवाय आले आणि रावणाची लंका बिभीषणाकडे तर वानर भूमी सुग्रीवाकडे देऊन ते राजे अयोध्येत गेले.
तरीही आज दोन्ही गोत्र आहेत आणि एवढे सगळे तुला सांगण्याचे कारण की तुझे नाना नामदेव भले कापड दुकानदार होते आणि वडील ख्रिस्ती झाले होते पण तू मुळात विश्वामित्र गोत्र धारण केलेला आहेस .
कबीर यावेळी कौशिक गोत्रात जन्म घेतला आहेस .
धन्यवाद आचार्य . माझ्या मनात हा प्रश्न आजवर होता त्याचे समाधान झाले.
तुझा वेद ऋग्वेद आणि कुलदेवी जया, भट्टराईका, किंवा योगेश्वरी ही आहे .
माझ्या लक्षात राहील आचार्य .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा