मैत्रेयी वेताल
मैत्रेयी - ठाकुर सर, प्ह्या मळार हांव कितें करूंक शकता जें म्हाका म्हजो प्रकल्प पुराय करपाक मदत करतलें
मला काहिच न कळले हे समजण्यासाठी मी दोन्ही हात वर करून खांदे झटकले आणि विचारले ,काय मैत्रेयी ??
Oh sorry sorry ते मी कधी कधी विसरून जाते मी आता पुण्यात आहे .
मला या परिसरात काय करता येइल के माझ्या प्रोजेक्ट ला पूर्ण करण्यास मदत करेल.
तुझे specialization कोणते आहे , प्रोजेक्ट मॅनेजमेंट तिच्याकडून समजल्यावर मी तिला समजावले मी अग्री बिझनेस आणि टूर & ट्रॅव्हल चे specialization चा मेंटोर झालो आहे या वर्षी तू देशपांडे सर ला भेट ते आहेत project management चे मेंटोर.
But sir मला असे वाटते की मी तुमच्या कडे यासाठी आले आहे की मी तुमच्या कडून काही आयडिया घ्यायला आले आहे .
तुझे आई वडील काय करतात मी विचारले ,
आई आणि आजी आजोबा इथे गोव्याजवळ गावात राहतात मी PG मध्ये राहते मैत्रिणीसोबत, सगळ्या सेम specialization च्याच आहेत का , मी विचारले नाही त्यांनी आयटी मॅनेजमेंट आणि analytics specialization घेतले आहे. मी त्यांना काही मदत करू शकेल कारण मी statistics शिकवतो . मी तुला परत सांगेल की तू देशपांडे सर ला भेट .
न ऐकण्याच्या मनःस्थितीत तिने विचारले बर तुमच्या specialization मध्ये काय प्रोजेक्ट आहेत .
ते मी आणि माझे स्टूडेंट डिस्कस केल्यासच कळेल.
ठीक आहे मी wait करते तुमचा एखादा स्टूडेंट येईपर्यंत.
मी ह्या नवीन ओळखीत आलेल्या उथळ स्वभावाच्या मुलीला का entertain करतोय असे मला वाटायला लागले.
आणि तेवढ्यात महासेन पोचला .
राम कृष्णा हरी ठाकूर गुरुजी, राम कृष्ण हरी बोल कसकाय आला आज गावाकडून अचानक .
काही नाही शेवटच semester सुरू झाले प्रोजेक्ट करायचा आहे म्हणून आलो त्याने सांगितले.
Oh really, nice मी पण त्यासाठीच आले येथे .
मैत्रेयी ने मध्येच आम्हा दोघांचे लक्ष वेधले . ही कोण ?
प्रोजेक्ट मॅनेजर बनायला नवीन पिढी आली आहे ,
" लहान वयात आलेल्या उथळ स्वभावाच्या मुलीला कस हाताळाव ते सांग , तिला सांगून थकलोय देशपांडे सर आहेत तिचे mentor पण ती ऐकत नाही." मी दबक्या आवाजात त्याला सांगितलं.
बघतो मी काय करता येत ते . ठीक आहे आम्ही अनुभवी आहोत पण नवीन पिढी आली तर काय हरकत आहे. "ज्याने त्याचे काम केले तर वेळ कमी लागतो राजा " मी महसेन च्या सल्याला उत्तर दिले . हसू आवरत ठीक आहे गुरुजी थांबा जरा.
तो तिच्याकडे गेला आणि मी माझ्या स्टूडेंट च्याच attendance आणि वेगवेगळ्या याद्या तयार करत बसलो .
जवळपास एक तासाने महासेंन आवाज देत बोलला गुरुजी मैत्रेयी चा प्रोजेक्ट फिक्स झालाय, एवढ्या लवकर! मी आश्चर्याने विचारले.
हा ती आताच दोन वर्षापूर्वी बी कॉम झाली आहे आणि लगेच ती mba जॉईन झाली मग तिला मी सांगितले की मी नवीन ऍग्रो बिझनेस चालू करतोय तर त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करू .
अरे पण तिला प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये काहीतरी करू दे ना आणि तुम्हा दोघांचे दोन वेगळे प्रोजेक्ट असणार आहे ना .
हा गुरुजी माझा प्रोजेक्ट तुम्ही सांगा तिचा प्रोजेक्ट मी सांगतो . मला राहवले नाही मी देशपांडेला फोन करून बोलावले आणि ती मुलगी दाखवून विचारले काल माझ्याकडे सहज एक्सेल शीट वर Gant chart बनवायला आली आणि आज डोक्याला ताप झाली आणि आमचा माहासेन पण त्या मुलीला मदत करायला पुढे गेला आता काय करतोय काय माहीत.
म्हणजे तिचा प्रोजेक्ट फिक्स झालाय का ?? असे मला विचारून देशपांडे पुढे मैत्रेयी कडे गेला आणि या भाषेत बोलू लागला " काय काकूबाई लागला का निकाल तुमच्या प्रोजेक्ट च".
हो तो महासेण आज भेटला आणि मी विचारले ते सर्व प्रश्न त्याने उत्तर दिले आणि जोपर्यत मी त्याच्या प्रोजेक्ट मध्ये असेल तोपर्यंत मी फक्त त्याच्याकडेच लक्ष द्यावं असे बोलला.
कुठे आहेत ते सद्गृहस्थ असे बोलून देशपांडे पुढे माहसेन कडे गेला अरे हा तर तुमचा गावाकडचा शेतकरी मुलगा आहे त्याने ओळखून विचारपूस केली.
महासेनं ही पुढे पूर्ण केले 1 वर्षाने भेटतोय तरी ओळख नाही विसरले गुरजी तुम्ही.
कसा विसरेन बिझनेस स्कूल मध्ये राम कृष्णा हरी बोलणाऱ्या मुलाला मी, देशपांडे ने जोडले त्यात आमची परंपरा दिसते गुरुजी.
ठीक आहे आता ह्या मुलीचा विषय कसा हाताळला बाबा तू सगळ्या mentor la भेटली तरी तिचा प्रोजेक्ट फिक्स होत नव्हता हे तर जूनच आहे मला काहीतरी नवीन पाहिजे , हे फार लांबलचक आहे मला सोप पाहिजे असे सगळे जण आपापल्या परीने प्रयत्न करून थकले आणि ठाकूर तर आधीच घाबरला वाटत .
देशपांडे तू तुझ्या कामात व्यस्त आणि इतर सगळे का त्रस्त बाबा सांभाळ ना तू आणि ती म्हणजे तिचा तू फिक्स्ड mentor आहेस ना .
नाही तिला विषय सांगितले भरपूर पण, ती डोक्यावर जाते.
बरं महसेण काय सांगितलं प्रोजेक्ट तिचा .
माझ्या 10 एकर शेतीमध्ये ह्यावर्षी खरीप पिकांचे नियोजन हा तिचा प्रोजेक्ट!! महासेन ने जोडले.
आणि तुझा काय ?? मी विचारले
माझ्या शेतीचे सर्व उद्योग तसेच मार्केट कमिटी मध्ये विकेपर्यंत चा हिशेब हा माझा प्रोजेक्ट,
हे सगळे तू ह्या mba chya साच्यात बसवू शकतो असे वाटते तुला.
हा गुरुजी मी आलोय त्यासाठीच तुमच्या मदती शिवाय नाही होणार ते .
पण मला वाटले काय एक प्रॉडक्ट घेऊन नवीन बिझनेस केस करून संपवशिल इतरांसारखे .
तुम्ही सांगा तुम्हाला पटत नसेल तर देतो सोडून महासेन निर्वणीच्या स्वरात बोलला . मी म्हणालो बघ तुला जे जमतंय ते .
आणि तू ह्या देशपांडेंच्या एका student ची पण जबाबदारी घेतली . माझे व्यक्तिगत मत आणि तुझे मत यात फरक आहे..
ठीक आहे गुरुजी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा